नांदेड : विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील रहा -खा. अजित गोपछडे
नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केले. मौजे डौर (ता. बिलोली) येथे सी.सी. रस्त्यासाठी तब्बल ₹१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल डौर येथील ज्
विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.


नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केले. मौजे डौर (ता. बिलोली) येथे सी.सी. रस्त्यासाठी तब्बल ₹१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल डौर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते खय्युम पटेल आणि समस्त डौर ग्रामस्थांच्या वतीने खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मणराव ठक्करवाड (भाजपा जिल्हा सरचिटणीस) उपस्थित होते. त्यांच्यासह उमाकांत गोपछडे, हाजप्पा पाटील सुंकलोड, चंद्रशेखर सावळीकर, हावगीराव गोपछडे, डॉ. लखमपुरे, धोंडू सावकार, गंगाधरराव भिंगे, सुधाकरराव कन्ने, आबाराव संगनोड, शिवराज बोधने, अशोकराव साखरे, दिनेश दाचावार, प्रकाश अर्जुने, शैलेश याकावार, हणमलू ईरलावार, शिवलिंग पाटील, अभिजीत धरमुरे, शिवाजी पांडागळे, राजेश खरबाळे, प्रकाश साखरे, नागेश जवळे, भिम पोतनकर, नरेश सब्बनवार, हणमंतराव पाटील (कोळगाव), व्यंकट नरवाडे, संदीप रामपुरे, यांच्यासह डौर गावातील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नागरी सत्कार समारंभात गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत भावनिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande