
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या निवासस्थानी कवडगाव ता. वडवणी, जि. बीड येथे भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी फलटण येथे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात कुटुंबीयांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्या वेळी पीडित कुटुंबीयांनी एसआयटीची मागणी केली होती.बाळासाहेब आंबेडकर यांनी मागणी केली की, डॉ. मुंडे यांच्या देखरेखीखाली झालेल्या पोस्टमोर्टमची चौकशी करावी. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, डॉ. मुंडेंवर प्रेशर होता की नाही? कोण कोण दबाव टाकत होते, हे समोर येईल. त्यातील केसेसची व्याप्ती लक्षात येईल.त्यानंतरच दबाव आणणारे डॉक्टर, पोलिस, राजकारणी, सामाजिक क्षेत्रातील कोणते लोक होते हे लक्षात येईल. याची चौकशी करावी.या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या सविताताई मुंडे, प्रदेश महासचिव किसन चव्हाण, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis