
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.भाजप खासदार डॉक्टर कराड यांनीजालना जिल्हा दौऱ्या दरम्यान भोकरदन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणाऱ्या भोकरदन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार तसेच नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.जालना जिल्हा प्रभारी या नात्याने या मुलाखती घेताना उमेदवारांचा आत्मविश्वास, कार्यनिष्ठा आणि पक्षावरील निष्ठा पाहून मनोमन समाधान वाटले. असे त्यांनी सांगितले.भोकरदन शहराच्या विकासासाठी समर्पित आणि लोकाभिमुख नेतृत्व पक्षाकडून उभे राहील, असा विश्वास आहे. असा उल्लेख त्यांनी केला.या प्रसंगी भोकरदन विधानसभेचे आमदार श्री.संतोष पाटील दानवे, जालना ग्रामीण निवडणूक प्रमुख श्री. सुरेश बनकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis