
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नासिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भाजपा एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याबाबत माजी खासदार समीर भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची बैठक संपन्न झाली. या युतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नाशिकच्या राजकारणामध्ये आघाडी महायुती होणार की नाही यावर वेगवेगळे तर्कवितर्क सुरू असतानाच सोमवारी मात्र महायुती होणार याबाबत आता पावले उचलली जात असल्याचे समोर आले आहे अगदी दोनच दिवसापूर्वी महायुती करावी म्हणजेच भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्रित जिल्ह्यामध्ये निवडणुका लढवाव्यात यासाठी म्हणून येवला व इतर भागासाठी चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये त्यांनी चर्चा केली होती पण हे मात्र जिल्ह्यातील काही भागासाठी मर्यादित होते.
पण जिल्ह्यातील उर्वरित काही नगरपरिषदांसाठी महायुती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे निर्णय लागले असतानाच सोमवारी नाशिक दौऱ्यावरती आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी भेट घेतली दोघांमध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली या चर्चेमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यानी युती करावी याबाबत चर्चा झाली. या भेटीमध्ये जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थिती संदर्भात देखील चर्चा झाली जिल्ह्यात कोणत्या नगरपालिकेमध्ये कसं गणित बसवायचं यासाठी लवकरच या दोन्हीही नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगितले गेले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत प्रदेश स्तरावरून देखील या दोन्ही नेत्यांना अनुमती मिळालेली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महायुतीमध्ये तिसरा भिडू असलेल्या शिवसेने बाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV