बीड: बाजार समितीत लपवून ठेवलेली १ कोटीची कार सापडली
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात तब्बल १ कोटी रुपयांची एक कार आणि काही यंत्रे सापडली आहेत. ही कार इथे लपवून ठेवली होती. आता ही कार कुणाची याचा पोलिस शोध घेत आहेत. कारला नंबर प्लेट नाही. त्यामुळे चेसीस नंबर
बीड: बाजार समितीत लपवून ठेवलेली १ कोटीची कार सापडली


बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात तब्बल १ कोटी रुपयांची एक कार आणि काही यंत्रे सापडली आहेत.

ही कार इथे लपवून ठेवली होती. आता ही कार कुणाची याचा पोलिस शोध घेत आहेत. कारला नंबर प्लेट नाही. त्यामुळे चेसीस नंबरवरुन मालकाचा शोध घेण्यासाठी आज सोमवारी पोलिस आरटीओला पत्र देणार आहेत.

बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत देशमुख नावाच्या व्यक्तीचा एक मोठा गाळा आहे. अनेक दिवसांपासून हा गाळा बंद होता. देशमुख तो गाळा वापरत नव्हते. ते काही कामानिमित्त गाळा उघडण्यासाठी गेले असता त्यांचा गाळा त्यांच्याकडील चावीने उघडत नव्हता.

यावेळी त्यांना गाळ्याचे कुलूपच बदलल्याचे लक्षात आले. त्यांनी कुलूप तोडून गाळा उघडला. यावेळी आतमध्ये महागडी गाडी आणि काही यंत्रे आढळून आली. त्यांनी याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली. पीआय अशोक मुदीराज यांनी भेट देऊन पाहणी केली. गाळ्यात असलेली गाडी ही तब्बल १ कोटींची गाडी होती. तर यंत्र ते तेल कारखान्यातील होते.

दरम्यान, बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेच्या सुरेश कुटे यांच्याकडे याच प्रकारच्या गाड्या होत्या. त्यांचा तेल कारखानाही होता. त्यांच्या कारखान्यातून चोरीचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे हा तोच मुद्देमाल असावा अशी शंका आहे. गाडी मालकाचे नाव शोधण्यासाठी आरटीओला पोलिसांकडून पत्र दिले जाणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande