
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)राजकारणात शिक्षणाची अट नसल्याने कुणीही या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. यामुळे यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुरुषांना पदवीधर, तर महिलांना बारावी उत्तीर्ण अशी अट टाकण्यात यावी, अशी मागणी महिला व तरुणाईकडून होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगर परिषद निवडणुकीतून कार्यकर्ते हे नेते होतात. उमेदवारी अर्ज भरताना शिक्षण हे अल्प राहते. त्यात इंग्रजी भाषासुद्धा अनेकांना अवगत नसते. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्याकरिता शिक्षणाच्या अटीची मागणी आता जोर धरू लागली आहे.ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची प्रगती म्हणजे शिक्षण. आज भारताने सर्व क्षेत्रात शिक्षण व तंत्र युगामुळे प्रगतीचे पुढे पाऊल टाकले, हे येथे उल्लेखनीय.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी