किल्ले भुदरगडाला सुंदर पर्यटनस्थळ बनवणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेला ऐतिहासिक किल्ले भुदरगड हा तालुक्याचे मोठे वैभव आहे.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पॅराग्लायडिंग पर्यटकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. विविध सोयीसुविधांमुळे भुदरगड किल्ला पर्यटकांचे प्र
किल्ले भुदरगड पर्यटन स्थळ


कोल्हापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेला ऐतिहासिक किल्ले भुदरगड हा तालुक्याचे मोठे वैभव आहे.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पॅराग्लायडिंग पर्यटकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. विविध सोयीसुविधांमुळे भुदरगड किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनत आहे. पर्यटक आकर्षित होतील असे या व ऐतिहासिक किल्ले भुदरगडाला सुंदर पर्यटनस्थळ बनविण्यासाठी व येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा मिळाव्यात आणि गडकिल्ल्यांचे जतन तसेच संवर्धन अबाधित रहावे आणि भुदरगडाकडे पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते किल्ले भुदरगड येथे मंजूर झालेल्या पॅरामोटरींग, पॅराग्लायडींग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी या साहसी खेळांच्या ॲक्टीव्हीटींचा शुभांरभ प्रसंगी बोलत होते.

भुदरगड तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक किल्ले भुदरगडचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येत असून किल्ल्याच्या डागडुजीसह येथे लहान मुलांसाठी बालोद्यान तसेच गडावरील तलावात पर्यटनासाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्व सोयीसुविधा कार्यान्वित करण्यात आल्या.

यावेळी के.जी.नांदेकर , जेष्ठनेते बाळकाका देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले, कल्याणराव निकम, मदनदादा देसाई, ॲड.शिवाजीराव राणे, दौलतराव जाधव सर यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande