गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। गेवराई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे. समाधान मस्के आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे. त्य
शिवाजीनगर व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकत वाढली


बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। गेवराई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे. समाधान मस्के आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे शिवाजीनगर व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकत वाढली आहे.

प्रवेश कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, विनोद सौंदरमल, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा, दादासाहेब घोडके, सरपंच शितल साखरे, शितल धोंडरे, बंडुसेठ मोटे यांच्या उपस्थित होते. वीस वर्षे नगर परिषद आणि दहा वर्षे आमदार म्हणुन सत्तेत असतांनाही शहराच्या विकासाचे प्रश्न रखडत ठेवणारे आता सत्तेच्या लालसेने अभद्र युती करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या लालसेने दोन विरोधक एकत्र आले तरी जनता मात्र त्यांना स्विकारणार नाही. असा उल्लेख आमदार विजयसिंह पाटील यांनी केला

विधानसभेच्या निवडणुकीनंतर केवळ दहा महिण्यात आपण अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहराच्या विकासासाठी भरीव निधी मंजुर केला आहे. शहरातील अनेक वर्षापासुनचे रखडलेले प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासाची गंगा निरंतर वाहत ठेवण्यासाठी शितल दाभाडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande