अमरावतीत किसान मोर्चाच्या सातही मंडळ अध्यक्षांची घोषणा
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी नुकतीच अमरावती शहरातील सातही मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. या नियुक्त्या भाजपा शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या परवानगीने
किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी केली सातही मंडळ अध्यक्षांची घोषणा


अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी नुकतीच अमरावती शहरातील सातही मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. या नियुक्त्या भाजपा शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या परवानगीने करण्यात आल्या.मिलिंद बांबल हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. शारदानगर वार्ड उपाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा महासचिव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा बडनेरा विधानसभा प्रमुख तसेच दोन वेळा किसान मोर्चा अध्यक्ष अशी त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या घट्ट संपर्कामुळे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत तिसऱ्यांदा किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांबल यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पक्षनिष्ठ कार्य पाहता त्यांनी आता मजबूत व सक्रिय अशी किसान मोर्चाची शहर कार्यकारिणी उभी केली आहे.

घोषित करण्यात आलेल्या सात मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे – संतोष खरबडे – अध्यक्ष, संत गाडगे बाबा मंडळ संजय ठाकरे – अध्यक्ष, विद्यापीठ मंडळ रवी काळबांडे – अध्यक्ष, कॉटन मार्केट मंडळ गौरव किटूकले – अध्यक्ष, साईनगर मंडळ प्रभाकर महल्ले – अध्यक्ष, स्वामी विवेकानंद मंडळ योगेश मुराई – अध्यक्ष, अंबा मंडळ अक्षय बारापात्रे – अध्यक्ष, बडनेरा मंडळ

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे होते. सरचिटणीस बादल कुलकर्णी, ललित समदूरकर, चेतन पवार, सौ. राधा कुरिल, सुनील काळे, सचिन रासने यांच्यासह भाजपा मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी सांगितले की, “शहरातील सातही मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांनंतर आता पुढील पंधरा दिवसांत सर्व २२ प्रभाग व ८७ वार्ड अध्यक्षांची घोषणा करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande