लातूर जिप प्रशासनाने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कापला एक दिवसाचा पगार
लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चेहरा ओळख प्रणाली बसवली आहे. तरीही कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार लातूर जिल्हा
लातूर जिप प्रशासनाने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कापला एक दिवसाचा पगार


लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चेहरा ओळख प्रणाली बसवली आहे. तरीही कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कापला आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या १४ विभागात जवळपास ३५० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांची दैनंदिन कार्यालयीन उपस्थिती पूर्वी थम मशीनवर होत होती. नंतर मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले. तेही बंद पडल्याने ऑफलाईन मस्टरवर कर्मचा-यांची नोंद होत होती. त्यामुळे कांही कर्मचारी उशिरानेही कार्यालयात येत असल्याने त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चेहरा ओळख प्रणाली दि. १६ जुलै पासून बसवली आहे. या नव्या प्रणालीवर कर्मचा-यांची माहिती अपलोड केली आहे. सदर मशिनच्या समोर कर्मचारी उभा रहाताच त्यांच्या उपस्थितीची नोंद होत आहे.

लातूर जिल्हा परिषदेने गेल्या कांही महिण्यापासून सर्व कामकाज ई-ऑफीस प्रणालीवर सुरू आहे. त्यामुळे सर्व कर्मचा-यांनी वेळेत कार्यालयात येऊन कामकाज सुरू करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने ऑक्टोबर मध्ये दिवाळीपूर्वी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अस्लम तडवी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांनी रॅन्डमली अनेक विभागातील कर्मचा-यांच्या उपस्थिती संदर्भाने तपासणी केली असता आरोग्य विभागातील १९ कर्मचारी, शिक्षण विभागाचे १६ कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर विभागाच्या विभाग प्रमुखांना या संदर्भाने जि. प. प्रशासनाकडून नोटीस पाठवली होती. सदर विभागांचा खुलासा आल्यानंतर ३५ कर्मचा-याचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande