
नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांनी नांदेड येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला अधिक संघटनात्मक बळकटी मिळणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात अनेक जण प्रवेश करीत आहेत. पक्षप्रवेशाच्या वेळी नांदेड महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जिल्हा महामंत्री रामचंद्र मुसळे, भोकरचे भाजप शहराध्यक्ष विशाल माने, उद्योग आघाडीचे व्यंकटेश असावा आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis