नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उबाठाचे पदाधिकारी शिवसेनेत
नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. नांदेड दक्षिण (उबाठा) उपजिल्हाप्रमुख, श्रीमान गणेशर
नांदेड शिवसेना शिंदे गटात प्रवेश


नांदेड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

नांदेड दक्षिण (उबाठा) उपजिल्हाप्रमुख, श्रीमान गणेशराव मोरे,नांदेड दक्षिण ता.प्रमुख अशोक मोरे बाभुळगांवकर,(उबाठा) श्रीमान सुरेश पाटील हिलाल(उपजिल्हा संघटक (उ.बा.ठा.) यांनी शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते आमदार हेमंत पाटील, यांच्या हस्ते नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली,व हदगांव विधानसभा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी नांदेड़ दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे,उपजिल्हाप्रमुख बिल्लु यादव, यांच्यासह आदी पदाधिकारी व उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande