
- माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.) - परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड उपस्थित होते. परळी येथे मुंडे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे नगरपालिकेवर आत्तापर्यंत त्यांचेच वर्चस्व राहिले. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले आहेत.
परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने त्यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ माणूस असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशमुख यांचा प्रवेश धनंजय मुंडे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis