अंजनगाव नगरपालिका निवडणूकीत नविन उत्साही व्यक्तींना उमेदवारीची संधी मिळणे कठीण
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणूकत शहरवासीयांना २८ नगरसेवक निवडून देणे असून एक नगराध्यक्ष निवडणे आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची चुरस लागली असून, योग्य
अंजनगाव नगरपालिका निवडणूकीत नविन उत्साही व्यक्तींना उमेदवारीची संधी मिळणे कठीण


अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणूकत शहरवासीयांना २८ नगरसेवक निवडून देणे असून एक नगराध्यक्ष निवडणे आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची चुरस लागली असून, योग्य उमेदवार निवडण्यात सर्वच पक्षांची अक्षरशः दमछाक होत आहे.शहरात स्थायिक पातळीवर भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू असल्याने इच्छुक उमेदवारांची यादी लांबलचक होत असल्याने नगराध्यक्षपद व विविध प्रभागांमधील उमेदवार ठरवताना पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजी स्पष्टपणे समोर येत आहेत.

नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने निवडणुकीचे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. नव्याने झालेली प्रभाग रचना, स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांचा हस्तक्षेप आणि जनतेत वाढता विरोध लक्षात घेता, पक्ष नेत्यांना योग्य आणि अयोग्य उमेदवार ठरवणे कठीण झाले आहे.

प्रभागातील अनेक नागरिकांना “प्रस्थापित” नगरसेवकांविषयी नाराजी व्यक्त करताना दिसते. “विकासाच्या नावाखाली प्रभागात झालेल्या गैरव्यवहारांची जनता विसरलेली नाही,” असा सूर नागरिकांतून ऐकू येतो.

*घरातीलच उमेदवारांचे ‘लॉन्चिंग’ सुरू!*

शहरातील काही माजी लोकप्रतिनिधींनी पद घरातच राहावे म्हणून आपल्या कुटुंबीयांना किंवा निकटवर्तीयांना उमेदवार बनविण्याची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर बॅनरबाजी करून “नवख्या सदस्यांचे” प्रास्ताविक लॉन्चिंग केले जात आहे.यामुळे पक्षांतील नव्या उमेदवारांची संधी कमी होत असून, “आपल्यालाच तिकीट मिळावे” या स्पर्धेत कोलटवडीची स्थिती निर्माण झाली आहे.

*चौका-चौकात रंगली चर्चा; माजी नगरसेवकांवर टीकेचा भडिमार!*

प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या शासकीय वाहनांसाठी डिझेल पेट्रोल घन कचरा गाडी कंत्राटदाराचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शहरातील माजी नगरसेवक यांनी या प्रकरणावर कोणतीही दखल न घेता पाहण्याची भुमिका घेतली होती .त्यामुळे आता निवडणुक दरम्यान या बाबत चर्चा चांगलीच रंगत असून या कथित व्यवहारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.काही नागरिकांनी तर अशा नगरसेवकांची यादीच तयार केली असून, सोशल मीडियावरही या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

*युतीचे गणित अजून धूसर*

राज्य पातळीवर महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे समीकरण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर युती होईल की नाही, हे सांगणे सध्या कठीण झाले आहे. अध्यक्षपद असो वा प्रभागनिहाय निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही रणनीती आखण्यात व्यस्त आहेत, मात्र परस्पर ताळमेळ मात्र अद्यापही दिसून येत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande