पुण्याहून अबुधाबीसाठी पुन्हा विमानसेवा
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सहा वर्षांनंतर पुण्याहून पुन्हा अबुधाबीसाठी विमानसेवा सुरू होत आहे. येत्या दोन डिसेंबरपासून ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने आठवड्यातील तीन दिवस ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्याहून दुबई व बँकॉकनंतर ही तिसरी आंतरर
Air Plane


पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

सहा वर्षांनंतर पुण्याहून पुन्हा अबुधाबीसाठी विमानसेवा सुरू होत आहे. येत्या दोन डिसेंबरपासून ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने आठवड्यातील तीन दिवस ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्याहून दुबई व बँकॉकनंतर ही तिसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.पुण्याहून अबुधाबीसाठी यापूर्वी ‘जेट एअरवेज’ या विमान कंपनीने सेवा सुरू केली होती. मात्र, २०१९ मध्ये ही कंपनी बंद झाल्याने ती बंद झाली. आता सहा वर्षांनंतर ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ पुणे-अबुधाबी विमानसेवा सुरू करीत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande