
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय बीड येथे बीड नगर परिषद निवडणूक २०२५ या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
माजी आ. श्री.संजय भाऊ दौंड, डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर,युवक जिल्हाध्यक्ष श्री.बळीराम गवते,श्री.अशोक हिंगे, प्रदेश प्रवक्ते श्री.भागवत तावरे, आणि फारुक पटेल यांच्या निरीक्षते खाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत पार पडल्या..सर्वच इच्छुक उमेदवारांचे पक्षातील कार्य,स्थानिक संघटन,सामाजिक व राजकीय कार्य, बीड शहराच्या विकासाचे व्हिजन आदी सविस्तर माहिती मुलाखतीद्वारे जाणून घेण्यात आली.निवडणूकांचे बिगुल वाजले असून स्थानिक कमिटी व पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार लवकरच नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार जाहीर होतील.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis