“सशक्त अंबड – सक्षम नेतृत्व” या ध्येयासाठी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवावा-भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)“सशक्त अंबड – सक्षम नेतृत्व” या ध्येयासाठी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी अंबड येथे केले आहे.जालना जिल्हा दौऱ्या दरम्यान अंबड येथे अंबड नगरप
“सशक्त अंबड – सक्षम नेतृत्व” या ध्येयासाठी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवावा,


छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)“सशक्त अंबड – सक्षम नेतृत्व” या ध्येयासाठी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी अंबड येथे केले आहे.जालना जिल्हा दौऱ्या दरम्यान अंबड येथे अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार तसेच नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते

जालना जिल्हा प्रभारी या नात्याने या मुलाखतींमध्ये सहभागी होताना पक्षनिष्ठा, कार्यकुशलता आणि अंबड शहराच्या विकासासाठी असलेली उमेदवारांची प्रामाणिक इच्छाशक्ती पाहून मनोमन समाधान वाटले. असे ते म्हणाले, अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि “सर्वांच्या सहभागातून सबलीकरण” या संकल्पनेला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे.या मुलाखतींच्या वेळी जालना जिल्हाध्यक्ष आमदार नारायणराव कुचे, जालना ग्रामीण निवडणूक प्रमुख श्री.सुरेश बनकर तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी अंबड नगरपरिषद निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि जनसेवा या तत्त्वांवर आधारित उमेदवार उभे करेल, याची पूर्ण खात्री आहे.अंबडच्या जनतेने पुन्हा एकदा “सशक्त अंबड – सक्षम नेतृत्व” या ध्येयासाठी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande