
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केलेल्या आहेत.सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असल्यामुळे इच्छुकांचे प्रमाण अधिक होते लवकरच या मुलाखतीमधून उमेदवार दिले जाणार आहेत अशी माहिती सत्कार यांनी दिली.सिल्लोड नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने जनसंपर्क कार्यालय सिल्लोड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 28 नगरसेवक पदासाठी 172 हुन अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. उमेदवारी भरण्यासाठी इच्छुकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला.शहरातील प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी वाजतगाजत शक्तीप्रदर्शनाने शिवसेना भवनकडे आगमन करीत मुलाखती सिल्लोड शहरातील शिवसेना भवन कार्यालयात हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis