शुक्रवारपासून अमरावतीत ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरू होत आहे. यंदा प्रथम
१ ४ नोव्हेंबर पासून अमरावती येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात


अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अमरावती येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं. दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे सुरू होत आहे. यंदा प्रथमच अतिशय सुसज्ज अशा या नाट्यगृहात स्पर्धेचे नाटक सादर करता येणार असल्यामुळे स्पर्धकांमध्ये अतिशय उत्सुकता असून आनंद सुद्धा व्यक्त केल्या जात आहे. रसिक प्रेक्षकांना देखील या नाट्यगृहात अतिशय सुंदर वातावरणात नाट्यानुभव घेता येणार आहे.दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.

या स्पर्धेमध्ये एकूण १६ संघांचा सहभाग असून अमरावती जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande