
बीड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई येथील समाजकार्यात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते आर्यन मांदळे, उज्जैन बनसोडे, महेश उर्फ गुड्डू जोगदंड, योगेश माने, गौतम शिंदे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक दृढ केली. नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून पुढील यशस्वी राजकीय कारकीर्दीसाठी भाजप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शुभेच्छा दिल्या.
युवा पिढीची ऊर्जा, नवी दृष्टी आणि समाजातील बदलासाठीची तयारी हे कोणत्याही राजकीय संघटनेचे महत्त्वाचे संपत्तीस्थान असते. आर्यन मांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे अंबाजोगाई परिसरात पक्षकार्याला निश्चितच नवे बळ मिळणार आहे. असे आमदार मुंदडा म्हणाल्या. या प्रवेशप्रसंगी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) आणि अक्षय मुंदडा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
________
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis