
परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। देहराडून ते परभणी हा धडाडीचा सायकल प्रवास पूर्ण करून आलेले संस्थेचे सचिव नितीन लोहट यांची विशेष मुलाखत जिजाऊ आयटीआय येथे आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीत प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, आव्हाने आणि सामाजिक संदेश यांवर सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना आयटीआयचे प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी केली. त्यांनी अशा धाडसी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे उमेदीचे विचार निर्माण होतात, आत्मविश्वास वाढतो व साहसी प्रवृत्तीला चालना मिळते, असे सांगत पाहुण्यांचे स्वागत केले. मुलाखती मधील प्रश्नोत्तरांच्या रोचक शैलीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आली. प्रवासातील रोचक किस्से, अपघातांपासून सुटका, पर्वतीय प्रदेशातील थंडी, दीर्घ मैलांचा रोजचा प्रवास यावर आलेले अनुभव नितीन लोहट यांनी सांगितले.
मुलाखतीत गट निदेशक जाधव यांनी या सायकल प्रवास कार्यक्रमा मागील प्रेरणा, नियोजन आणि टीमवर्क याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून सकारात्मक जीवनमूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व निदेशकांनी, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण मुलाखतीत प्रवासाची धडाडी, प्रश्नोत्तरांची बुद्धिमत्ता आणि प्रेक्षकांचा उत्कट सहभाग यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis