
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।अकोल्याच्या पातुर तालुक्यातील सावरगाव येथे रस्ता मिळत नसल्याने मंजुळा जानकीराम डाखोरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. घरासमोरील व्यक्तीने घरकुलाचे बांधकाम करून मार्ग बंद केल्याची तक्रार महिलेने वारंवार ग्रामपंचायत व प्रशासनाकडे केली होती. रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन देत प्रशासनाने दोन वेळा त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले. मात्र दोन महिने उलटूनही दखल न घेतल्याने महिलेने ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. चान्नी पोलिस ठाणेदार रविंद्र लांडे यांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचवण्यात आला. पोलिसांनी महिलेविरुद्ध आत्मदहनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, महिला आपल्या स्मरणपत्रात जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट आरोप करत आहेत. तर दुसरीकडे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे