दर्यापूर नगर पालिकेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून स्थानिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीची घोषणा केली आहे. यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी स्थानिक ढोकणे भवन येथे पत्रकार परिषदेत यु
दर्यापूर नगर पालिकेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून स्थानिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीची घोषणा केली आहे. यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी स्थानिक ढोकणे भवन येथे पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे.भाजप व राष्ट्रवादीच्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपकडे राहणार असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. २५ नगरसेवकांच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावरील बोलणीनंतर ठरवण्यात येणार आहेत. युतीचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत स्पष्टता देण्यात आली नसली तरीही ७० - ३० असा फॉर्म्युला राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असून, भाजपही स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे अगोदर सांगण्यात आले होते. मात्र वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार दर्यापुरात भाजप व राकाँ (अजित पवार गटाने) युती करत महायुतीची घोषणा केली आहे. शिवसेना (शिंदे गट) ही या युतीमध्ये सामील होणार का, याबाबत दोन्ही पक्षांनी तूर्तास मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे जुन्या दर्यापुरात बऱ्यापैकी प्राबल्य आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो. पत्रकार परिषदेला भाजपचे बाबाराव बरवट, मदन बायस्कर मेघा भारती, अनिल कुंडलवार, भरत शुक्ला, विजय मेंढे, माणिक मानकर, रोशन कट्यारमल, दीपक पारोदे, तुषार कडू तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील मोपारी, अमोल गहरवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande