बीड नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुकांची निर्णायक बैठक संपन्न
बीड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। बीड नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शिवसेना निरीक्षक मनोज शिंदे लोकसभा संपर्कप्रमुख ठाणे, बापूसाहेब मोरे बीड जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची निर्णायक बैठक पार पडली. या
बीड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा


बीड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। बीड नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शिवसेना निरीक्षक मनोज शिंदे लोकसभा संपर्कप्रमुख ठाणे, बापूसाहेब मोरे बीड जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची निर्णायक बैठक पार पडली.

या शिवसेना निरीक्षक मनोज शिंदे लोकसभा संपर्कप्रमुख ठाणे, बापूसाहेब मोरे बीड जिल्हा संपर्कप्रमुख यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करत मुक्त संवाद साधला.

शिवसेनेशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहून निवडणूक लढवा. अठरा-अठरा तास महाराष्ट्र हितासाठी काम करणारे उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहेत. जिथं गरज पडेल तिथे उभं राहून मदत करणारा आणि सर्वसामान्यांचं हीत पाहणारा आपला नेता आहे. बीड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. असे निरीक्षक मनोज शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी इच्छुक उमेदवारांसह शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, ओबीसी व्हिजेएनटीसेना, एसटी कामगार सेनेसह सर्व अधिकृत संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तथा शिवसैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande