नांदेडमध्ये महिला सन्मान रॅली उत्साहात
घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले नांदेड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
Q


घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले

नांदेड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी प्रकल्प) नांदेड शहर तर्फे बाल हक्क व महिला सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली आयटीआय महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते महिला खेळाडूंना विश्वचषकाची प्रतिकृती देण्यात आली, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्त्री सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. रॅलीचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी भारतीय महिला खेळाडूंची वेशभूषा धारण केली होती. अंगणवाडी प्रकल्पातील लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा धारण केली होती. नांदेड शहरातून निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

रॅलीमध्ये एक सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला होता. रॅलीमध्ये नांदेड शहरातील जवळपास 550 अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. संबंधित रॅलीला संबोधित करताना बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी संबंधित रॅलीचे प्रयोजन सांगितले, त्यांनी याद्वारे पालकांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्या मुलीला जन्माला येऊ द्यावे, तिला शिकू द्यावे व खेळू द्यावे.

भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकून आणल्याबद्दल संबंधित संघाचेही अभिनंदन करण्यात आले. सदरील रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व मदतनीस, सेविका व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande