नांदगाव पेठ जि.प. सर्कलमध्ये काँग्रेसची महिलाशक्ती सज्ज
यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणीअमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसने देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या म
नांदगाव पेठ जि.प. सर्कलमध्ये काँग्रेसची महिलाशक्ती सज्ज    यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी


यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणीअमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसने देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा विदर्भाच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर स्वतः या निवडणुकीकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा निर्धार करत त्यांनी पक्षयंत्रणा सज्ज केली असून या सर्कलमध्ये तोलामोलाचा उमेदवार देऊन भाजपला शह देण्याची तयारी काँग्रेसने पूर्ण केली आहे.या मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने चार महिला दावेदारांनी जोरदार तयारी केली असून, शेवटी कोणाला पक्षाचे अधिकृत तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांच्या पदरी निराशा आणि एका उमेदवाराला संधी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.त्यातही काँग्रेसच्या आघाडीवरील नाव म्हणजे माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा केचे. त्यांनी नांदगाव पेठ परिसरात दीर्घकाळ जनसंपर्काचे मजबूत जाळे निर्माण केले आहे. स्थानिक स्तरावर महिलांसोबत काम, सामाजिक बांधिलकी आणि प्रत्येक गावाशी असलेले सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. मागील कार्यकाळात विविध विकासकामांत त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचा शांत पण परिणामकारक स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती यामुळे त्या पक्षांतर्गत आणि जनतेत लोकप्रिय आहेत. याशिवाय माहुली जहागीरच्या माजी सरपंचा आणि काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी ज्योती ठाकरे यांचीही दावेदारी तितकीच प्रबळ आहे. त्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून यशोमती ठाकूर यांच्या विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.नांदगाव पेठ येथील माजी पंचायत समितीचे उप सभापती बाळासाहेब देशमुख हे नांदगाव पेठ मधील राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. अश्यातच त्यांच्या पत्नी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विभा देशमुख यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा असून नेत्यांनी संधी दिल्यास आपण राजकीय रणांगणात बाजी मारू असा विश्वास देशमुख दाम्पत्याने व्यक्त केला. डिगरगव्हाण येथील विद्यमान सरपंच जिल्लेश्वरी ठाकरे ह्यांनी आपल्या कार्यकाळात गावोगावी विकासाची छाप पाडली आहे. डॉ. शंकरराव ठाकरे यांचा काँग्रेसशी असलेला जुना निष्ठावान संबंध आणि जनसंपर्कही त्यांच्या बाजूने वजन वाढवतो.या सर्व पार्श्वभूमीवर, यावेळी नांदगाव पेठ सर्कलची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.ज्यांच्या नावाची चर्चा त्यांनाच उमेदवारी मिळणार की वेळेवर पक्षश्रेष्ठी आणखी कोणाला संधी देतात तसेच नाराज कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत कोणते सामाजिक-राजकीय समीकरण साधतात, यावर काँग्रेसचा विजय किंवा पराभव अवलंबून असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande