
सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। सामान्य प्रशासन विभागाचे २६ सप्टेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार तालुका, जिल्हा/महानगरपालिका, विभागीय, मंत्रालय स्तरांवरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश दिलेले आहेत. परिपत्रकातील कलम ५.७ नुसार लोकशाही दिन केव्हा होणार नाही याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.
नगरपालिका/नगरपंचायत निवडणूकीची आचारसंहिता ४ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. तर मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी आहेत. परंतु निकालाची घोषणा ८ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. तसेच १ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन देखील करण्यात येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड