अमरावती - बोटिंग रेसने अंबा रुख्मिणी महोत्सव 2025 ची सुरुवात
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 मध्ये कौडण्यपूर येथे नयनरम्य बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचे विहंगमय दृश्य कौडण्यपूर च्या वर्धा नदीपात्रात दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोटिंग रेस ने कौडण्यपूरच्या अंबा रुख्मिणी महोत्सव 2025 ची सुरुवात एक लक्ष दीपोत्सवाने उजळले श्री रुख्मिणीचे माहेरघर


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 मध्ये कौडण्यपूर येथे नयनरम्य बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचे विहंगमय दृश्य कौडण्यपूर च्या वर्धा नदीपात्रात दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पाहायला मिळाले. फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखाउपक्रम आयोजित करण्यात आला असून या बोटिंग स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून बोट चालकांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन नयनरम्य सादरीकरण केले.

अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या बोटिंग स्पर्धेला अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 चे उदघाटन रविराज देशमुख (अध्यक्ष, अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती), तर अध्यक्षस्थानी जगद्गुरू स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी माऊली सरकार तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री अंबिका देवी संस्थानचे पुजारी श्री नरेंद्र महाराज पुरी, सौ. गायत्रीताई देशमुख, तसेच सरपंच प्रेमदास राठोड, कुऱ्हा च्या सरपंच सौ. मीनाताई नायर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रविराज देशमुख व सौ. गायत्री देशमुख यांच्याहस्ते वरदायिनी मातेची आरती करण्यात आली. यावेळी वरदायिनी आरतीचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या दिमाखदार सोहळ्याचे प्रास्ताविक अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव अक्षय पुंडेकर यांनी केले. तर संचालन सौ. अश्विनी विलायतकर आणि आभार प्रदर्शन सुमित तट्टे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande