सोलापूर - माढा तालुक्यातील ४७ हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान
सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पुराने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणीसाठी राज्यशासनाने प्रति हेक्टर दहा हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा कालावधीत केवळ १७९ शेतकऱ्यांना १३ लाख ३३ हजार ३२० रूप
सोलापूर - माढा तालुक्यातील ४७ हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान


सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पुराने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणीसाठी राज्यशासनाने प्रति हेक्टर दहा हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा कालावधीत केवळ १७९ शेतकऱ्यांना १३ लाख ३३ हजार ३२० रूपये अनुदान मिळाले होते. नंतर यासाठीची फार्मर आयडीची असलेली अट शिथिल करून केवळ ईवायसी केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचा डाटाया कामासाठी वापरल्याने सध्या ४७ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे.

अतिवृष्टी आणि सिना नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील ११८ गावांना त्याचा फटका बसला असून सुमारे ६८ हजार शेतकरी यामुळे बाधीत झाले. यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे बी बीयांणासाठी पैसे उपलब्ध नाहीत. अशा बाधित शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांच्या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नसेल त्यांनी ईकेवायसी करून घेण्याची आव्हान प्रशासनाने केले आहे. आर्थिक अडचणी, वाफसा नसणे यासारख्या कारणांमुळे माढा तालुक्यात केवळ ३९ टक्केच रब्बीची पेरणी झालेली आहे. आता शासनाने केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होऊन रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande