पुणे : नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी साधला नारायणगावात शेतकऱ्यांशी संवाद
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विनीत भट, व्यवस्थापक रोहन मोहरे यांनी नारायणगाव येथे भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकरी, बँकेचे अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. कृषी कर्जपुरवठा होताना कोणत्या अडचणी येता
पुणे :  नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी साधला नारायणगावात शेतकऱ्यांशी संवाद


पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विनीत भट, व्यवस्थापक रोहन मोहरे यांनी नारायणगाव येथे भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकरी, बँकेचे अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. कृषी कर्जपुरवठा होताना कोणत्या अडचणी येतात, बँकेचे अधिकारी सहकार्य करतात का? शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत? राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतीसाठी कर्ज घेता का? आदी प्रश्नांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून कर्ज पुरवठ्याबाबत आढावा घेतला.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज दिले जाते. वाढलेला भांडवली खर्च विचारात घेता ही मर्यादा किमान पाच लाख रुपये करावी. द्राक्ष बाग उभारणीसाठी दीर्घ मुदतीचे एकरी पाच लाख रुपये कर्ज ११ टक्के व्याजदराने दिले जाते. ही कर्ज मर्यादा आठ ते नऊ लाख करून व्याजदर एक ते दीड टक्क्याने कमी करावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, संदीप जाधव, प्रसाद कोल्हे, संजीव गोसावी, जयमाला काळे, गणेश गाडेकर, बापू गायकवाड, योगेश सावंत, मंगेश घोडेकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande