पुण्यातील नवले पूल अपघात ब्रेक फेलने नव्हे, तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा संशय
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)नवले पूल अपघातात कंटेनर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचा संशय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) व्यक्त केला आहे. अपघात घडल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी पुणे आरटीओ कार्यालयाच्या भरारी पथकाने अपघातग्र
पुण्यातील नवले पूल अपघात ब्रेक फेलने नव्हे, तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा संशय


पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)नवले पूल अपघातात कंटेनर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचा संशय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) व्यक्त केला आहे. अपघात घडल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी पुणे आरटीओ कार्यालयाच्या भरारी पथकाने अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली.कंटेनरच्या पुढचा भागाचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे आरटीओ प्रशासनाचे म्हणणे आहे. नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर मागील पाच वर्षांत शहरातील सर्वांत धोकादायक ठिकाण बनला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा भाग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, अवजड वाहनांची ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.या अपघातांमध्ये इतकी जीवितहानी झाल्यावरही महामार्ग व्यवस्थापन, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबई-बंगळूर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यापासून काही अंतरावरील स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलादरम्यान मागील तीन वर्षांत गंभीर आणि किरकोळ अशा एकूण २७ अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातांमध्ये २७ जणांचा बळी गेला आहे. तर ३७ जण जखमी झाले आहेत. ही माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande