सोलापूर - ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू
सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तर सीना नदीलाही मोठ्या प्रमाणात महापुर आला होता. त्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. तर अद्यापही काही ठिकाणी वापसा नाही, तर जमिनीतून आजही पाणी वाहत आहे.
PIK Agri


सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तर सीना नदीलाही मोठ्या प्रमाणात महापुर आला होता. त्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. तर अद्यापही काही ठिकाणी वापसा नाही, तर जमिनीतून आजही पाणी वाहत आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जमिनीची मशागत ही करता येईना तर वाफशा अभावी रब्बी हंगाम पुढे चालला आहे. पावसाळ्या पासून ते गेल्या आठवड्या पर्यंत ढगाळ हवामान होते, मात्र गेल्या आठवड्या पासून कडक थंडी पडू लागली आहे. ही थंडी गहू, हरभरा, कांदा या पिकांना अत्यंत पोषक आहे.

सध्या कांद्याची लागवड व पेरणी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गव्हाची पेरणी अत्यंत कमी झाली आहे. बाजारात सध्या ज्वारीचा दर गव्हाच्या बरोबरीने आहे. ग्रामीण व शहरी भागात ज्वारीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते त्यासाठी उशीर का होईना या अनुषंगाने ज्वारी पेरणी सुरू आहे. शेवटी चारा म्हणून कडबा का पदरात पडेना अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande