अमरावती महापालिकेच्या छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक २ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी, महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार प
अमरावती महानगरपालिकेच्या छायाचित्र स्पर्धा २०२५ अंतर्गत विजेत्यांना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक २ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी, महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले.

स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक मंडळी श्री. उदय खोत (BFA), श्री. विकास केमदेव (MA) आणि श्री. अद्वेत केवले (B.Sc. Environmental Science) यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या परीक्षणानंतर स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते खालील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रथम क्रमांक : शंतनु पाटील — छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ११,०००/- रोख

द्वितीय क्रमांक : भूषण अळसपुरे — छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ७,०००/- रोख

तृतीय क्रमांक : संदीप चौधरी — छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ५,०००/- रोख

प्रोत्साहनपर बक्षिसे म्हणून : सुशांत पांडे — छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ३,०००/- रोख

मनीष मु-हेकर — छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. २,०००/- रोख

या स्पर्धेला शहरातील छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, प्रतिभावंत छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेचा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, स्पर्धक तसेच नागरिक उपस्थित होते. या समारंभात अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्‍तात्रय फिस्‍के, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, मार्वे, भुषण खडेकार, गणेश काकडे, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande