पुणे - काम करायचे नसेल तर पदे सोडा- राज ठाकरे
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी ‘बुथ लेव्हल एजंट’ नेमण्याच्या कामाची पुण्यातील स्थिती पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारा चढला आणि ते बैठकीतून नि
Raj thakare


पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी ‘बुथ लेव्हल एजंट’ नेमण्याच्या कामाची पुण्यातील स्थिती पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारा चढला आणि ते बैठकीतून निघून गेले. जाताना ‘काम करायचे नसेल, तर पदे सोडा’ असा इशारा दिल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांची ‘बुथ लेव्हल एजंट’ शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून पदाला चिकटून बसलेल्या मनसेचे काही पदाधिकारी ‘बुथ लेव्हल एजंट होता का?’ अशी विचारणा करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार चोरीचा उपस्थित केलेला मुद्दा, त्यासाठी महाविकास आघाडीशी केलेली संगत या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी ‘बुथ लेव्हल एजंंट’ नेमून मतदार यादी अद्ययावत आहे का, याबाबत माहिती घेण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. त्याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले. प्रमुख पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांच्या तयारीची अवस्था पाहून ते बैठक सोडून निघून गेले. मात्र, जाताना त्यांनी ‘काम करायचे नसेल, तर पद सोडा’ असा आदेशच दिल्याने अनेक दिवसांपासून पदांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande