
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)महानगरपालिकेने कर आकारणीमध्ये सुधारणा करत, अपेक्षित भाडे दरानुसार क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत क्रीडाई अमरावतीतर्फे माननीय आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी क्रीडाई अमरावतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी अध्यक्ष शैलेश वानखडे, अध्यक्ष राजन पाटील, सचिव श्रीकांत धर्माळे, तसेच राम महाजन, निलेश ठाकरे, पंकज देशमुख, भूषण देशपांडे, दिलीप भाई पोपट, अनिल विखे, कपिल आंडे, रवींद्र गोरटे, सचिन वानखडे, नितीन शेंद्रे, पप्पी ढवळे, पापा चंदेले, ज्ञानेश्वर हिवसे, मंगेश हजारे, दीपक गोडवाणी, मधुर लड्डा, रवी महल्ले, आशिष दुधे, सुदीप पेठे आदी सदस्य उपस्थित होते.कर आकारणीमध्ये पारदर्शकता वाढविणारे आणि नागरिकहिताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे कर व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व न्याय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी