पदवीधर, शिक्षक मतदारयादी तयारीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी दि. १.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदारयादी तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार महत्वाच्या टप्प्यां
पदवीधर, शिक्षक मतदारयादी तयारीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी दि. १.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदारयादी तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार महत्वाच्या टप्प्यांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी अधिनियम, १९६० नुसार, या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार आता हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई ही दि. २८ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या मतदार याद्यांवर ३ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे आणि छपाई करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande