
नांदेड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुल्क प्रकारात विलंब शुल्क (मुदतवाढ) साठी आवेदनपत्र भरावयाची मुदत 11 ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत, विलंब शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस-एनईएफटीद्वारे भरणा करावयाचा कालावधी 11 ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत, माध्यमिक शाळांनी आरटीजीएस-एनईएफटीची पावती-चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत 19 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 'Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोट असणे आवश्यक आहे. सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.
पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना अनिलाईन पध्दतीने भगवयाची आहेत.
माध्यमिक शाळांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांचे Status Update होईल.
आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील virtual account = RTGS/NEFT द्वारे भरावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी RTGS/NEFT द्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच account number व IFSC code चूकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्या खात्यात जमा झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची जवाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना पुनःश्च मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis