
सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी या भागातील रहिवासी व व्यापारी यांनी केलेले अतिक्रमण, अस्वच्छतेसह इतर बाबींसंदर्भात सोलापूर महापालिका पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण सुरू आहे.
सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरण व संबंधित सर्व विभागांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेच्या वतीने विमानतळ परिसर लगत राहणाऱ्या सर्व नागरिक, व्यापारी, दवाखाने, मांसाहारी पदार्थ विक्रेते तसेच गॅरेज व्यावसायिक यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड