सोलापुरात रविवारी 52 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षीदेखील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.08 वाजता, गोरज म
सोलापुरात रविवारी 52 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन


सोलापूर, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षीदेखील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.08 वाजता, गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.

यंदाचे विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष असून यावेळी 52 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून, विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे.

वधू-वरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहउपयोगी साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. भोजनव्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत. यंदा 49 जोडप्यांमध्ये 3 बौद्ध जोडपे तसेच 46 हिंदू जोडपे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande