नगर परिषद निवडणुकीत ‘तिकीट फिक्स’ची चढाओढ; अनेक इच्छुकांचा अपक्ष लढण्याचा निर्धार
अमरावती, 15 नोव्हेंबर, (हिं.स.) नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षणात झालेल्या बदलांमुळे अनेक इच्छुकांना स्वतःच्या प्रभागात संधी मिळणार नसल्याने ते इतर प्रभागात लढण्याची तयारी करत आहेत. कोणत्याही
नगर परिषद निवडणुकीत ‘तिकीट फिक्स’ची चढाओढ; अनेक इच्छुकांचा अपक्ष लढण्याचा निर्धार


अमरावती, 15 नोव्हेंबर, (हिं.स.) नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षणात झालेल्या बदलांमुळे अनेक इच्छुकांना स्वतःच्या प्रभागात संधी मिळणार नसल्याने ते इतर प्रभागात लढण्याची तयारी करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत यंदा निवडणूक लढायचीच, असा निर्धार अनेक संभाव्य उमेदवारांनी केला आहे.

तिकीट मिळविण्यासाठी नेतेमंडळींच्या भेटीगाठींना वेग आला असून इच्छुकांकडून स्थानिक खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे ‘मीच योग्य उमेदवार’ असल्याचे पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीजणांनी तर स्वतःऐवजी आपल्या पत्नीला उमेदवारी देण्याची मागणी करत नवीन शक्कल लढविल्या आहेत. तिकीट ‘फिक्स’ करण्यासाठी गळ घालणे, मोर्चेबांधणी आणि शक्तिप्रदर्शन सुरू आहे.

दरम्यान, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय अनेकांनी पक्का केला आहे. यासाठी समर्थकांची बैठका, आंतरिक तयारी आणि प्रचारयोजनांनाही वेग आला आहे. सोडतीमुळे आरक्षण बदलले असले तरी लढायचेच, असा चंग बांधल्याने निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande