नवले पूल अपघातानंतर समन्वय बैठक; सहा महिन्यात करणार सुधारणा
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.) नवले पुलावरील भीषण अपघातानंतर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्‍यांची समन्वय बैठक झाली. यात पुन्हा एकदा दीर्घकाली
नवले पूल अपघातानंतर समन्वय बैठक; सहा महिन्यात करणार सुधारणा


पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.) नवले पुलावरील भीषण अपघातानंतर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्‍यांची समन्वय बैठक झाली. यात पुन्हा एकदा दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स स्ट्रीप, कॅटआय लावण्यास उशीर होऊ नये, यासाठी हे काम स्वतः महापालिकेने करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आज सकाळी नवले पूल परिसरात पाहणी केली. त्यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, ‘‘नवले पुलाच्या ठिकाणची स्थिती भयानक आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी समन्वयकाची भूमिका घेऊन येथील कामे सहा महिन्यांत पूर्ण करू.महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, नवले पुलाच्या ठिकाणची स्थिती भयानक आहे. तेथील स्थिती सुधारणे आवश्‍यक आहे. यासाठी महापालिका समन्वयकाची भूमिका घेऊन येथील कामे सहा महिन्यात पूर्ण केली जातील. काजत्र बोगद्यापासून नवले पुलापर्यंत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर रम्बलर्स स्ट्रीप लावणे, चार लेनमध्ये कॅट आय लावल्या जातील हे काम महापालिका करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande