ठाणे महापालिका हद्दीत रेबीज पल्स लसीकरण मोहीम सुरू
ठाणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या “Rabies Free India” धोरणांतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीत “Rabies Free Thane” मोहीम सन 2024 पासून राबविली जात आहे. रेबीज पल्स मोहिमेसह दैनंदिन लसीकरण मोहीम आजपासून (14 नोव्हे.) महापालिका हद्दीत सुरू करण्
ठाणे


ठाणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या “Rabies Free India” धोरणांतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीत “Rabies Free Thane” मोहीम सन 2024 पासून राबविली जात आहे. रेबीज पल्स मोहिमेसह दैनंदिन लसीकरण मोहीम आजपासून (14 नोव्हे.) महापालिका हद्दीत सुरू करण्यात आली आहे.

ठाणे शहराला सन 2030 पर्यंत रेबीज नियंत्रणित क्षेत्र म्हणून घोषित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

ठाणे महानगरपालिकेने जानेवारी-फेब्रुवारी सन 2024 व 2025 मध्ये पल्स लसीकरण मोहिम कार्यक्रमांतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7,409 भटके श्वान लसीकृत करण्यात आले. तर फेब्रुवारी 2025 मध्ये 11,582 भटके श्वान लसीकृत करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

या मोहिमेत भटक्या कुत्रे व मांजरांचे अँटी-रेबीज लसीकरण करुन रेडीयम रिफलेक्टर कॉलर भटक्या श्वानांच्या गळ्यात घालण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्राणी मित्र संस्थेचे स्वयंसेवक व स्थानिक स्वयंसेवी संस्थांची (NGOs) मदत घेण्यास व सहभागी करुन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande