
सोलापूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। रेल्वे प्रवासाला सुरक्षित, सुगम आणि आरामदायी बनवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक वेग दिला आहे. याच अनुषंगाने, रेल्वे विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मोठा चाप दिला आहे.यामध्ये सोलापूर विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
2025-26 या आर्थिक वर्षातील (एप्रिल ते ऑक्टोबर 2025) या सात महिन्यांच्या काळात, 1 लाख 41 हजार अनधिकृत आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड म्हणून तब्बल 6 कोटी 72 लाखांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. सोलापूर विभागाने सुव्यवस्थित आणि सखोल तिकीट तपासणी मोहिमेद्वारे हे यश मिळवले आहे. ही कारवाई रेल्वे नेटवर्कमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे पहायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड