
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
: जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. दिवसभरात नगराध्यक्षपदांसाठी ३२ तर नगरसेवकपदांसाठी ५५५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी गेल्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता निवडणूक आयोगाने रविवारी सुटीच्या दिवशी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील 11 नगरपरिषद कार्यालयांमध्ये इच्छुकांची गर्दी बघायला मिळाली. आतापर्यंत नगराध्यक्षपदांसाठी एकूण ६० तर नगरसेवकपदांसाठी एकूण ९८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सोमवारी शेवटचा दिवस आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV