
परभणी, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिंतूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी कडून प्रताप देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
प्रताप देशमुख यांनी जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. त्यांच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावली. स्वच्छतेसह पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण यासारख्या अनेक गोष्टीत ,योजनावर लक्ष केंद्रित केले.
नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली.
पंतप्रधान नरेंद् मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही अशी ते म्हणाले.दरम्यान आज रोजी निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis