
अमरावती, 16 नोव्हेंबर (हिं.स.): आगामी नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) अमरावती जिल्ह्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले आहेत. अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधत, भाजपने सर्वसमावेशक उमेदवार निवडल्याचे दिसून येते.
भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारांची यादी:
अंजनगाव सुर्जी - अविनाश गायगोले
चिखलदरा - राजेंद्रसिंह सोमवंशी
अचलपूर - रुपाली अभय माथने
दर्यापूर - नलिनी प्रकाश भारसाकळे
चांदूर बाजार - कांता अहीर
चांदूर रेल्वे - स्वाती मेटे
मोर्शी - रश्मी उमाले
वरूड - ईश्वर सलामे
शेंदूरजना घाट - सवर्णा वरखेडे
धामणगाव रेल्वे - अर्चना रोठे
नांदगाव खंडेश्वर - स्वाती पाठक
धारणी - सुनील चौथमल
पक्षाकडून कार्यकर्त्यांना 'न्याय':
या उमेदवारी यादीमध्ये पक्षाने जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देत, 'सार्थ निवड, कार्यकर्त्याला न्याय' ही भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व उमेदवारांनी स्थानिक स्तरावर पक्षासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे, ज्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदासाठी निवडण्यात आले आहे. पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे सर्व उमेदवार विजयी होतील, यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी