गंगाखेड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून उजनामाईन शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नगराध्यक्ष निवडणुकीत आज कॉंग्रेसच्या वतीने उजमामाईन युनूस शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या प्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, शहराध्यक्ष युनूस शेख, युवक कॉंग्रेसचे सिद
गंगाखेड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून उजनामाईन शेख यांचा  उमेदवारी दाखल


परभणी, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। नगराध्यक्ष निवडणुकीत आज कॉंग्रेसच्या वतीने उजमामाईन युनूस शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

या प्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, शहराध्यक्ष युनूस शेख, युवक कॉंग्रेसचे सिद्धोधन भालेराव, माजी नगरसेवक महेबुबभाई, दत्तराव भीसे, शिवाजी घोबाळे, नगरसेवक पदाचे उमेदवार डिगंबर यादव, ॲड. लिंबाजी घोबाळे, आकाश मोटे, तबरेज आलम आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande