नाशिक - बिबट्याच्या हल्ल्यात जखमी कर्मचाऱ्यांची वनमंत्र्यांनी घेतली भेट
नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। - कामगार नगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वन वभागाच्या कर्मचाऱ्यांची वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. मंत्री गणेश नाईक य
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी कर्मचाऱ्यांची वनमंत्र्यांनी घेतली भेट


नाशिक, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

- कामगार नगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वन वभागाच्या कर्मचाऱ्यांची वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

मंत्री गणेश नाईक यांनी श्री गुरुजी हॉस्पिटल, येथे जाऊन रेस्क्यू ऑपरेशन मधील जखमी वनरक्षकांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. मंत्री महोदयांनी वनरक्षक संतोष बोडके व प्रवीण गोलाईत या दोघांनी रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दाखविलेल्या अतुलनीय धाडस व शौर्याचे कौतुक केले तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.दोघांच्याही प्रकृतीतील सुधारणा व सुरू असलेल्या उपचारांबाबत श्री गुरुजी हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी यांचेशी चर्चा केली.

यावेळी मुख्य वनसंरक्षक मल्लिका अर्जुन प्रादेशिक, सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक, पश्चिम भाग नाशिक, प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक, सुमित निर्मळ, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक (प्रादेशिक) उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande