
छत्रपती संभाजीनगर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जानेफळ येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीची निवडणूक
आज होते आहे आज रविवारी या ठिकाणी मतदान झाले.
जानेफळ (ता.फुलंब्री) येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला.
गावच्या विकासासाठी, शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि सहकार चळवळीला बळकटी मिळण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. लोकशाही प्रक्रियेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, असं आवाहन आमदार चव्हाण यांनी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis