
सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. या काळात अतिवृष्टीने जिल्ह्यातील 12 हजार 50 हेक्टर क्षेत्रावरील माती खरडून गेली. त्यामुळे या जमिनी कसण्यायोग्य राहिल्या नाहीत. यासाठी राज्य शासनाकडे 57 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी ढासळून त्यात गाळ पडला आहे. या विहिरीच्या दुरुस्तीचेही नियोजन आखण्यात येत आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड